Breaking Ticker

पर्यावरणवादी पुंडलिकराव मापारी यांचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार



लोणार तालुका प्रतनिधी सुनिल वर्मा

लोणार येथील पर्यावरणवादी नागरिक पुंडलिकराव मापारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने तहसीलदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोणारचे तहसीलदार गिरीश जोशी, नायब तहसीलदार डोळे यांनी ५ जून रोजी दुर्गा टेकडीला भेट देऊन दुर्गा टेकडीवर २५० एकर वनराई तयार करणारे पर्यावरणवादी पुंडलिकराव बाणाजी मापारी यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना जोशी म्हणाले की, मापारी यांनी गत ३० वर्षा पासून आपल्या ऐहिक सुखाचा त्याग करून आपले संपूर्ण आयुष्य पर्यावरण जतनाकरीता वाहून घेतले असून शहरातलगत असलेल्या उजाड माळरानावर स्वतः च्या अथक परिश्रमातून तब्बल २५० एकर क्षेत्रावर वनराई निर्माण करून खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचून खरी राष्ट्रसेवा केली आहे. 

ही वनराई लोणार शहरासाठी एक अमूल्य असा ठेवा असून शहरातील प्रत्येक नागरिकाने हि वनराई जतन करण्याच्या दृष्टीने प्रशासन व दुर्गा टेकडीवरील वनराई निर्माते पुंडलिकराव मापारी यांना सहकार्य करावे जेणेकरून हा अमूल्य ठेवा आपल्या पुढच्या अनेक पिढ्या साठी आदर्शवत ठरेलं असा आशावाद सुद्धा वेळी तहसीलदार त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी प्रा. वसंत मापारी, अशोक इंगळे, प्रा. दहिफळे, शाम राऊत, प्रा. आशिष रहाटे, गजानन जाधव, तानाजी मापारी, श्रीकांत मादनकर, विजय मोरे, अंभोरे आदींची उपस्थित होती..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.