Breaking Ticker

पर्यटन नगरी लोणारच्या विविध समस्या सोडविण्यासाठी एम आय एम च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

 


लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा 

लोणार शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी एम आय एम च्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

लोणार शहरातील नागरीकांना नगर परिषद मार्फत नळाव्दारे सोडण्यात येणा - या पिवळसर अशुद्ध पाणी, नालीतील घाणीचे साम्राज्य, मोकाट जनावरांमुळे शहरात डेंगु ,मलेरीया, ताप व ईतर आजाराने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे नगर परीषद लोणार नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी चौकशी करण्यात यावी व चौकशी अहवाल देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी एम आय एम चे युवा तालुकाध्यक्ष शेख जावेद शेख चांद कुरेशी सह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.