पनवेल तालुका प्रतिनिधी:- धनाजी पुदाले
गांजा’ हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगणाऱ्या इसमास पनवेल शहर पोलिसांनी पळस्पे फाटा परिसरातून अटक केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकामध्ये कार्यारत असलेले पोहवा अविनाश गंथडे यांना गुप्त बातमीदाराकडुन पळस्पे परिसरात गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पळस्पे फाटा येथील पानटपरीमध्ये अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपी सोहेल इक्बाल शहा (२३) याला ताब्यात घेतले. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याकडून ८,४७५ रुपये किमतीचा ०१ किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे.
