सुनिल वर्मा लोणार तालुका प्रतिनिधी
अध्यक्षपदी ॲड. दिपक पुंजाजी मापारी यांची निवड
लोणार तालुका वकिल संघाची सन 2023-24 वर्षाची नविन कार्यकारणी सर्व वकिल सदस्यांच्या वतीने जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी ॲड. दिपक पुंजाजी मापारी, उपाध्यक्षपदी ॲड. शिवशंकर संभाजी आघाव, सचिव पदी ॲड. सुधाकर अर्जुनराव अवचार, सहसचिव पदी ॲड. अशोक अवसरमोल, कोषाध्यक्षपदी ॲड. फौजीया अली या नविन संचालक मंडळाची निवड केली. यावेळी माजी अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल जायभाये यांनी दि. 13 / 06 / 2023 रोजी नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड.दिपक पुंजाजी मापारी यांच्याकडे कार्यभार सोपविला. यावेळी माजी सचिव ॲड.रणजित डव्हळे , माजी उपाध्यक्ष ॲड. ऋषीकेश डहाळके, जेष्ठ विधीतज्ञ ॲड. हाडे, ॲड. सदाशिव मुंढे, ॲड.शिवाजी सानप, ॲड. विठ्ठल तनपुरे, ॲड. सुजित मोरे, ॲड.भिमराव अंभोरे,ॲड.शुभम पालवे तसेच इतर सदस्य हजर होते. दरम्यान ॲड. शिवाजी सानप यांनी मनोगत व्यक्त केले . सदर कार्यकामाचे आभार प्रदर्शन ॲड. विठ्ठल तनपुरे यांनी केले. तर सुत्रसंचालन ॲड. शुभम पालवे यांनी केले. यावेळी सर्व नविन कार्यकारणीला शुभेच्छा देण्यात आल्या.
