Breaking Ticker

सरपंच रमाकांत गरुडे यांचा वाढदिवसानिमित्ताने विकास कामांचे लोकार्पण आणि आधारकार्ड शिबिराने आयोजन



पनवेल तालुका प्रतिनिधी:- धनाजी पुदाले 

विकास कामांचे लोकार्पण आणि आधारकार्ड शिबिराने सरपंच रमाकांत गरुडे यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. पनवेलजवळील आदई ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्ताने १ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता आदई ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन त्याचबरोबर आधारकार्ड शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.

यानंतर सायंकाळी ७ वाजता अभिष्टचिंतन आणि गुरु कदम संगीत जलसा हा मनोरंजनांचा कार्यक्रम पनवेलमधील मार्केट यार्ड येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच रमाकांत गरुडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.