Breaking Ticker

आर्थिक नुकसान भरपाईच्या यादीतून २७२ मच्छीमारांना वगळल्याने घारापुरी बेटवासी संतप्त : एमएमआरडीएचा निर्णय.



पनवेल तालुका प्रतिनिधी :- धनाजी पुदाले 

देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी- न्हावा-शेवा सागरी सेतु बाधित जागतिक एलिफंटा बेटावरील पारंपारिक मच्छीमारांना नुकसान भरपाईच्या यादीतून वगळले असल्याने घारापुरीवासीय संतप्त झाले आहेत.बाधीतांमध्ये एलिफंटा बेटावरील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार मोडत नसल्याने २७२ पारंपारिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार नसल्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. एमएमआरडीएने अचानक आर्थिक नुकसान भरपाईच्या यादीतून एलिफंटा बेटावरील हात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना वगळल्याने बेटवासी संतप्त झाले आहेत.

याआधी एलिफंटा बेटावरील हात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली आहे.मात्र त्यानंतर एमएमआरडीएने अचानक यादीतूनच एलिफंटा बेटावरील पारंपरिक मच्छीमारांना वगळले आहे.याप्रकरणी  एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची  भेट घेऊन पत्र देऊन विचारणा करण्यात आली असल्याची माहिती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर व उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.