Breaking Ticker

सुनिता वंजारे यांचा पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर सन्मान पुरस्काराने गौरव



लोहा(ता.प्र.) 

महीला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडुन ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह,हुंडा निर्मुलन,लिंग चिकीत्सा प्रतीबंध,घरगुती हींसा प्रतीबंध,महीला सक्षमिकरण,महीला स्वंय सहाय्यता बचत गट,आरोग्य,साक्षरता,मुलींच्या शिक्षणासाठी आदी.क्षेत्रात उलेखनिय कामगिरी करणा-या महीलांची ग्रामपंचायत स्तरावरुन निवड करुन "पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार" ३१ में २०२३ रोजी देण्याचा निर्णय महीला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी घेतला आहे.व त्याप्रमाणे कारेगाव ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात उलेखनिय काम करणा-या कारेगाव आंगणवाडी सेविका सुनिता नामदेव वंजारे यांना कारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान सरपंच सुमनबाई मुलुकपाडे, उपसरपंच गिरजाबाई किरवले, ग्रामसेवक उन्मेश जोंधळे यांच्या शुभ हस्ते "पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर " सन्मान पुरस्कार देऊन अंगणवाडी सेविका सुनिता वंजारे यांचा गौरव करण्यात आला आहे. 

सुनिता वंजारे यांना पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल श्यामसुंदर किरवले,माजी सरपंच रावसाहेब किरवले, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष अशोक मोरे, माजी सरपंच रामराव किरवले, उद्योगपती धनाजी दिघे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता दिघे, व्हाईस चेअरमन खंडु मोरे, अॅड.हनमंत मुलुकपाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी मोरे, सुधाकर किरवले, आक्रम सय्यद, रवि किरवले, देवानंद हंकारे,गोपिनाथ गायकवाड,मंगेश गायकवाड,अशोक कदम,रावण वाघमारे, विकास हंकारे, आदींनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.