सुनिल वर्मा तालुका प्रतिनिधी लोणार
आयोध्या येथून ते रामेश्वर पर्यंत सायकल यात्रा करणाऱ्या अभिषेक सावंत यांचा लोणार शहर काँग्रेस कमिटीच वतीने आज रोजी सकाळी 9:३० वाजता धारतीर्थ येते लोणार शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष तथा लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी व बुलढाणा जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक शाम राऊत, सामाजिक नेते गणी पटेल, यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन लोणार शहरात आगमन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला
अयोध्या येथील अक्षय सावंत नावाचा युवक अयोध्या ते रामेश्वरम सायकलवारी करीत आहे भगवान राम जिथे जिथे गेले आहे तिथे तिथे स्वतः जात असून एकूण आठ राज्यांमध्ये सायकल वारी करणाऱ्या अक्षय सावंत यांचे आज लोणार या पावन भूमीमध्ये आगमन होताच यावेळी महाराष्ट्रातील संस्कृती फार आदर जनक असून मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जात आहे तेथील महाराष्ट्रीयन मला चांगल्या प्रकारची वागणूक तसेच माझी राहण्याची खाण्यापिण्याची सोय करीत असून जिथे मी थांबतो तिथे चहा पाण्याची सोय सुद्धा महाराष्ट्र मध्ये होत असल्याने सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा या गाण्यातील ही ओळ खरंच खरी असल्याचे महाराष्ट्रातून प्रवासादरम्यान मला दिसून आली आहे महाराष्ट्रातील प्रवासानंतर मी कर्नाटक व नंतर तामिळनाडू असा 6 ते 7 महिन्याचा माझा प्रवास असणार असल्याचे आयोध्या ते रामेश्वरम सायकल वारी करणार अक्षय सावंत यांनी लोणार येथे विरज धारातीर्थ जवळ स्वतःचे मत मांडले आहे. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेख समद शेख अहमद, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गजानन खरात, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक शाम राऊत, सामाजिक नेते गणी पटेल, व लोणार शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते
