सुनिल वर्मा तालुका प्रतिनिधी लोणार
लोणार येथे शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्या वतीने रनिंग स्पर्धेत दीपक दराडे प्रथम क्रमांक पटकविल्या बद्दल आज सकाळी 11 वाजता श्री टॉकीज च्या कार्यालयात शिव छत्र मित्र मंडळाचे संस्थापकअध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील गुरुकृपा विद्यालयाचा विद्यार्थी दिपक प्रकाश दराडे यांनी दी. ३ जून रोजी नाशिक येथे आयोजित केलेल्या नॅशनल लेव्हल रनिंग स्पर्धेत १० किमी सहभाग घेतला होता. त्या मध्ये लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील गुरुकृपा विद्यालयाचा विद्यार्थी दिपक प्रकाश दराडे यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्त्या बद्दल दिपक प्रकाशदराडे यांचे शिवछत्र मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष नंदकिशोर मापारी, अरुण गीते, पांडुरंग मुंडे , दीपक साबळे, शंकर कुटे, अभिषेक आंधळे, वैभव कांगणे, विशाल अवसरमोल, शुभम नालेगावकर, मयूर कुटे, गजानन कुठे, विठ्ठल आघाव, ओम दराडेयांचे कडून दिपक दराडे यांचे कौतुक करुन सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील असुन सुद्धा शहरी खेळाडू सोबतस्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला बद्दल दिपक प्रकाश आपल्या गावाचं नाव मोठा केला यावेळी नंदकिशोर मापारी यांनी सांगितले व दराडे यांच्या मान सन्मान करून सत्कार केला. यावेळी शिव छत्र मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
