Breaking Ticker

न्यालयाचा आदेशाला स्थानिक विभागातील अधिकारी यांची केराची टोपली!



(सुनिल वर्मा लोणार तालुका प्रतिनिधी)

 लोणार मौजे देऊळगांव वायसा येथील आमच्या शेताचा अडविलेला रस्ता खुला करणे बाबत उपविभागीय अधिकारी मेहकर तसेच मेहकर येथील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयाचा आदेश होवुन रस्ता खुला करणेसाठी पोलीस सरंक्षण मिळणेसाठी दिड महिना होवुन सुध्दा पोलीस सरंक्षण न देता तहसील व पोलीस प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने शेतजमीन पडीत राहत असल्याने आमच्या अर्जावर अर्ज दिल्याच्या दिनांका पासुन 7 दिवसाचे आत पोलीस सरंक्षण न मिळाल्यास तहसील कार्यालयास समोर दि. 24 जुन 2023 रोजी पासुन अर्ध नग्न उपोषण करणार असल्या बाबत नमुद विषयाची तक्रार 1) भगवान सागर पंजरकर, 2) गजानन बाजीराव फड, 3) गणेश कडुसराव सोनुने, 4) नाथा नामदेव सोनुने, 5) महादा दौला सोनुने, सर्व रा. देऊळगांव वायसा ता. लोणार यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे दि. 16 जुन 2023 रोजी केलेली आहे. 

 याबाबत सविस्तर वृत्त तक्रारकर्ते यांची मौजे देऊळगांव वायसा शिवारात गट नं.362,358,359 व 356 मध्ये वडीलोपार्जीत जमीनी असुन शेतामध्ये जाण्या करीताचा नंबर धु-याचा रस्ता गैरअर्जदार यांच्या गट क्र. 363 यांच्या जमीनीच्या धु-याने असतांना गैरअर्जदार यांनी सन 2019 पासुन रस्ता अडविला आहे. त्यामुळे दि. 11/06/2020 रोजी अडविलेला रस्ता खुला करून मिळणे बाबत नायब तहसीलदार लोणार यांचेकडे प्रकरण दाखल केले होते परंतु तहसील कार्यालयाने चुकीचे स्थळ निरीक्षण करून अर्ज खारीज केला त्यानंतर तक्रारकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी, मेहकर यांचेकडे अपिल केली असता नायब तहसीलदार यांचा आदेश रदद करण्यात येवुन तक्रारकर्ते यांच्या बाजुने आदेश झाला असल्याने संबंधीत गैरअर्जदार यांनी गैरअजदार यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मेहकर येथे अपिल दाखल केली असता सदर अपिलाचा निर्णय सुध्दा तक्रारकर्ते यांच्या बाजुने लागलेला आहे. शेताचा अडविलेला रस्ता खुला करणे बाबत उपविभागीय अधिकारी मेहकर तसेच मेहकर येथील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयाचा आदेश झाला असल्याने नायब तहसीलदार श्रीमती परळीकर मॅडम यांना आदेशामध्ये नमुद नुसार रस्ता खुला करून मिळणे बाबत विनंती अर्ज केला असता त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, लोणार यांना आदेशानुसार रस्ता खुला करण्याकरीता दिनांक 11/05/2023 प्रमाणे तारीख निश्चीत करून नियमानुसार पोलीस बंदोबस्त पुरवावा असे पत्र दिले आहे त्यानंतर तक्रारकर्ते यांनी सुध्दा पोलीस स्टेशन लोणार यांना तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांच्याकडे पोलीस बंदोबस्त पुरविणे बाबत लेखी अर्ज दिला असतांना आज रोजी दिड महिना होत असतांना अदयाप पर्यंत जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा आदेश आम्हाला नसल्याने जो पर्यंत आदेश येत नाही तो पर्यंत आम्ही पोलीस बंदोबस्त देवु शकत नाही असे लोणार पोलीस स्टेशन त्या भागातील बिट जमदार बन्सी पवार हे सांगीत आहे.  

    आज रोजी पावसाळा सुरू झाला असुन शेतीची मशागत व पेरणी करण्यासाठी रस्ता अत्यंत आवश्यक असुन उपविभागीय अधिकारी मेहकर तसेच मेहकर येथील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयाचा आदेश होवुन तसेच पोलीस स्टेशन लोणार व पोलीस अधिक्षक बुलडाणा यांच्याकडे अडविलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देणे बाबत अर्ज करून आज रोजी दिड महिना होत असतांना अदयाप पर्यंत पोलीस सरंक्षण मिळाले नसल्याने आदेश असतांना रस्ता खुला होत नाही. तहसील कार्यालयास रस्ता खुला करणे बाबत विनंती केली असता, पोलीस सरंक्षण घ्या नंतर रस्ता खुला करू असे सांगीत आहे तर पोलीस स्टेशन लोणार अदयाप आदेश आला नाही अश्या प्रकारे उडवाउडवीचे उत्तरे दोन्ही विभागाकडुन मिळत असल्याने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन लोणार हे न्यायालयाचा तसेच महसुल विभागाचा रस्ता खुला करणे बाबत आदेश असतांना हेतुपुरस्कर रस्ता खुला करून देण्यास विलंब लावीत असल्याने सदर प्रकरणी आर्थीक व्यवहार होवुन बेजार करीत आहेत का ? लोणार पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांना लेखी पोलीस सरंक्षण मिळणे बाबत अर्ज करून सुध्दा दिड महिना होत असतांना अदयाप पर्यंत पोलीस सरंक्षण का देण्यात आले नाही ? न्यायालयाचा आदेश होवुन 4 महिने होत असतांना अदयाप रस्ता का खुला होत नाही ? पोलीस प्रशासन बंदोबस्त पावसाळा झाल्यावर देणार का ? महसुल अधिकारी व कर्मचारी पोलीस सरंक्षण आल्यावर आम्ही रस्ता खुला करून देतो म्हणत आहे अर्ज करून तसेच आज रोजी पावसाळा असतांना मात्र पोलीस सरंक्षण का मिळत नाही ? अशा प्रकारे उडवा उडवीचे उत्तरे देवुन शेतक-यास वेठीस धरणे कितपत योग्य आहे ? 

    तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांना सदरील प्रकरण माहित असतांना ते पोलीस स्टेशन लोणारला पोलीस बंदोबस्त देणे बाबत आदेशीत करून न्यायालया आदेशाचे पालन का करीत नाहीत ? पोलीस प्रशासनाचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष सदर प्रकरणात होत आहे का ? असे एक नाहीतर अनेक प्रश्न तक्रारकर्त्यांनी तक्रारीत नमुद केले आहेत. त्याचप्रमाणे तक्रार दिल्यापासुन 7 दिवसाचे आत रस्ता खुला करणे बाबत पोलीस सरंक्षण न मिळावे तसेच संबंधीता विरोधात नियमानुसार कार्यवाही करावी. अन्यथा न्याय मागणी साठी दिनांक 24 जुन 2023 पासुन तहसील कार्यालया समोर अर्ध नग्न बसुन आमरण उपोषण करण्यात येईल, असा ईशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. आता सदर प्रकरणी खरोखरच संबंधीत शेतक-यास तहसील व पोलीस प्रशासन वेठीस धरत आहे का ? तक्रारीनुसार पोलीस सरंक्षण मिळणार की तक्रारकर्ते यांना न्यायालयाचा आदेश असतांना उपोषण करावे लागणार याकडे शेतक-यांचे लक्ष वेधले आहे. ऐवढे मात्र खरे !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.