Breaking Ticker

पंचायत समिती लोणार घरकुल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर

 


लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा

घरकुलाची बांधकाम सुरू आहे किंवा कसे याची पाहणी न करता आर्थीक व्यवहार करून हप्ते वितरीत होतात का ? तक्रार कर्त्यांना पडला प्रश्न.... 

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत मौजे भुमराळा येथे आज रोजी सुरू असलेल्या घरकुल लाभार्थी यांचे ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून घरकुल जागेचे पाहणी न करता पंचायत समिती स्तरावरून हप्ते वितरीत होत असल्या बाबत नमुद विषयाची तक्रार तहसीलदार लोणार यांचे मार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे रमेश पंडीतराव हंबीले व सुभाष साहेबराव माळोदे दोघे रा. लोणार यांनी केली आहे.  

     याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंचायत समिती लोणार अंतर्गत येत असलेल्या भुमराळा गावामध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आज रोजी सुरू असलेल्या घरकुल लाभार्थ्यांकडे जागेचा नमुना आठ नसतांना तसेच काही लाभार्थ्यांच्या जागा नमुना आठ नुसार जागा एकीकडे तर बांधकाम दुस-या जागेत होत असतांना तर काही लाभार्थी यांचे पुर्वीचे पक्के घरे बांधकाम असतांना घरकुल विभागाकडुन कोणत्याही प्रकारची पाहणी न करता सर्रासपणे हम करे सो कायदा नुसार हप्ते टाकण्यात येत आहे. याबाबत संबंधीत तक्रारकर्ते यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांच्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही तसेच तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती सुध्दा देण्यात येत नसल्याने ग्रामपंचायत व पंचायत समितीचे संबंधीत घरकुल इंजीनिअर व हप्ते काढणारा डाटा ऐंन्ट्री ऑपरेटर हे हप्ता देतांना प्र्रत्यक्ष घरकुल जागेमध्ये बांधकाम सुरू आहे किंवा कसे याची कोणतीही पाहणी न करता हप्ते वितरीत होत असल्याने यामध्ये मोठया प्रमाणात आर्थीक व्यवहार होत आहे का ? मंजुर असलेले घरकुल काम सुरू आहे की नाही याची पाहणी न करता घरकुल हप्ते काढणारा संबंधीत डाटा ऐंन्टी ऑपरेटर व संबंधीत इंजीनिअर यांच्या हातामध्ये घरकुलाचे हप्ते काढण्याचा अधिकार असल्याने कोणत्याही प्रकारचे घरकुल बांधकामाचे निरीक्षण, बांधकामाचा टप्पा कोणत्याही प्रकारची पाहणी न करता आर्थीक व्यवहार करून हातामध्ये असलेल्या संधीची पुर्णत: फायदा घेवुन घरकुल न बांधता वरच्या वर जुन्या घरांवर घरकुलाचा निधी काढुन देत आहे का ? अशा प्रकारे शासनाच्या निधीचा अपहार करून आर्थीक मायाजाल कमविण्याचा धंदा ग्रामपंचायत व पंचायत समिती इंजीनिअर व डाटा ऐंन्ट्री ऑपरेटर करीत असतांना याकडे वरिष्ठांचे लक्ष नाही का ? असे एक नाहीतर अनेक प्रश्न तक्रारकर्ते यांच्या मनात निर्माण झाले आहेत. आज रोजी दोन हप्ते वितरीत झाल्याने संबंधीत घरकुल विभाग लवकरात लवकर संपुर्ण हप्ते बोगस काढण्याच्या तयारीत असल्याने हे लक्षात घेता तक्रार दिल्या पासुन आठ दिवसाच्या आत जिल्हा स्तरावरून चौकशी अधिकारी नेमुन सखोल चौकशी करावी अन्यथा दि. 10 जुलै 2023 रोजी पासुन पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. 

    त्याचप्रमाणे लोणार तालुक्यातील काही मोजक्याच गावातील घरकुलाचे हप्ते हे नियमीत पडीत असुन काही गावातील लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाचा टप्पा पुर्ण केला असता सदरील टप्याचा हप्त्यासाठी पंचायत समिती स्तरावर चकरा माराव्या लागत आहे यावरून हप्ता मंजुर करण्यासाठी नेमके लाभार्थ्यांना कोणाला भेटावे लागेल तसेच काय करावे लागेल हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांसमोर पडत आहे एकीकडे लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल बांधण्याचे घरकुल विभाग पत्र देते तर दुसरीकडे बांधकामाचा टप्पा स्वत:च्या खर्चाने केल्यावर सुध्दा हप्ता का पडत नाही ? तसेच अनेक लाभार्थी घरकुल हप्ता मिळाला नसल्याने पंचायत समितीत वणवण फिरत असतांना मात्र याबाबीवर वरिष्ठ सुध्दा लक्ष देत नसल्याने घरकुल विभागाचे हप्ते टाकणारे हेच वरीष्ठ झाले असल्याने त्यांच्या मनमर्जीने हप्ते पडत असल्याची चर्चा तालुक्यातील लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात करतांना दिसुन येत आहे. यावरून सदर प्रकरणी गट विकास अधिकारी यांनी पाठपुरावा करून ज्यांचे घरकुल बांधकाम टप्पा पुर्ण झाला आहे अश्यांना तातडीने पुढील हप्ते वितरीत होत आहे का कसे हे पाहणे गरजेचे झाले आहे. अन्यथा संबंधीत हप्ते वितरीत करणा-यांची हम करे सो कायदया ही मनमानी वाढल्या शिवाय राहणार नाही. ऐवढे मात्र खरे ! आता सदर प्रकरणी कार्यवाही होणार की पुन्हा घरकुल हप्ते संदर्भात ईतर गावातील नागरीकांच्या सुध्दा तक्रारी पुढे येणार हा येणारा काळच ठरवेल याकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.