Breaking Ticker

लोणार तालुक्यात खुप मोठ्या उत्साहाने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती साजरी



तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा लोणार

आज लोणार तालुक्यात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची 110 वी जयंती मिरवणूक काढण्यात आली होती, करेकर्माचे अध्यक्ष अभय भाऊ चव्हाण माजी समाज कल्याण सभापती डॉक्टर प्रशांत राठोड मेहकर उत्पन्न बाजार समितीउप सभापती जगाराव आडे माजी नगराध्यक्ष बाबुसिंग जाधव सर नगरपालिका नगरसेवक सतीश भाऊ राठोड युवक अध्यक्ष भारत भाऊ राठोड युवक कार्यकर्ते आकाश भाऊ राठोड खुरामपूर, चोरपांग्रा येथील विठ्ठल भाऊ, लोणार तांडा येथील भारत भाऊ राठोड , विष्णू भाऊ राठोड , बळीराम राठोड , शेषराव चव्हाण, गुलाब राठोड सर, विनायक राठोड बिबखेड, संजय भाऊ राठोड उपसरपंच बिबखेड, डॉक्टर संतोष आडे लोणार, रवी भाऊ जाधव, लोणार येथिल लक्ष्मण जाधव नाईक , संतोष राठोड कारभारी, यांच्या हाताने वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले... त्या वेळेस तांडा तांडा तून खुप मोठ्या उत्साहाने समाज या रॅलीत सहभागी झाला, बंजारा समाजाच्या चालीरीती प्रमाणे बंजारा वेशभूषेत महिला आणि पुरुष खुप मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले..... या मिरवणुकीत सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व युवकाने जागो जागी नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.... ही मिरवणूक लोणार तांडा येथून विनायक चौक, मापारी कॉलनी मार्गे लोणार तांडा येथे रॅली चा समारोप करण्यात आला.....

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.