पनवेल तालुका प्रतिनिधी:- धनाजी पुदाले
पनवेल विभागातील बहुतेक पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये नव्याने रुजू झालेले पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे , खोपोली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत तसेच खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांची पनवेल येथील बाळकडू पत्रकार यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
काही दिवसांपूर्वीच पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये पनवेल विभागातली पोलीस स्टेशनचाही समावेश आहे. सध्या पनवेल विभागात चोरीचे व अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे त्यामुळे येथील पोलीस अधिकाऱ्यांना त्याचे मोठे आवहान असते. त्यासाठी येथील पोलीस दलास कायम सतर्क राहावे लागते.
पत्रकाराने पारदर्शक पत्रकारिता कसे करावे व पोलीस प्रशासनास सहकार्य कसे करावे याचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी यावेळी सर्व पत्रकारांना केले. यावेळी पत्रकार शितल पाटील, मच्छिंद्र पाटील, धनाजी पुदाले, राजपाल शेगोकार, जगदिश क्षीरसागर उपस्थित होते.
