सुनिल वर्मा लोणार तालुका प्रतिनिधी
*लोणार शहर काँग्रेस कमिटी व विविध सेलच्या नियुक्तीचे वाटप करण्यात आले*
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार बूथ कमिटी स्थापन करण्याच्या दृष्टीने लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विस्तारित कार्यकारणी बैठक दिनांक 10 जुलै दुपारी 3 वाजता निकिता पेट्रोल पंप च्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन दादा सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दादू शेठ, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, अतुलजी शिरसाट, सेवा दलाचे प्रदेश संघटक प्रकाश धुमाळ, माझी जिल्हा कोषाध्यक्ष शांतीलालजी गुगलीया, अण्णाभाऊ साठे फोरम प्रदेश अध्यक्ष साहेबराव पाटोळे, नगराध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी,वामनराव झोरे, अशोक पोपळे, ज्ञानेश्वर चिपडे, यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रेयांनी सांगितले की लोणार तालुक्यातील व शहरातील तालुक्यात व शहरात जाऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बूथ कमिटीची स्थापना करा शहरामध्ये वार्डा वार्डात जाऊन कार्यकर्त्यांचे मिळावे घेऊन बूट कमिट्या स्थापन करा व तालुक्यातील शहरातील सर्व बूथ कमिट्या पूर्ण करा तसेच येणाऱ्या भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने बुथ कमिटीचे महत्व समजून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले होते, यावेळी प्रकाश धुमाळ, साहेबराव पाटोळे, बादशाह खान, आपले मनोगत व्यक्त केले, लक्ष्मण दादा घुमरे यांनी मेहकर मतदारसंघातील अनेक प्रश्नन समोर मांडले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लढतीवर सुद्धा प्रकाश टाकला, श्यामभाऊ उमळकर,यांनी बुथ कमिटीचा महत्व व जबाबदारी या बाबीवर भाष्य केले, बंटी दादा सपकाळ यांनी जयपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशना मध्ये ठरल्याप्रमाणे आपल्याला बूथ कमिटीच्या कार्यक्रम देण्यात आला आहे तसेच मा. राजेंद्र शिंगणे यांनी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला
यावेळीकार्यक्रमाचे आयोजन लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले होते यावेळी प्रदीप संचेती नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक शेख रऊफ भाई, सुभाष सोनवणे, प्रदीप संचेती,माजी नगरसेवक शेख अस्लम, पंढरी चाटे, शेख करामत शेख गुलाब , शंकर हेदे, माजीद कुरेशी,दौलत मानकर,शैख जुनेद, शेख अजमत शेख अनामत, फैयाज खान, श्रीकृष्ण बाजाड, मोसीन शहा, लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवा काँग्रेसचे पदाधिकारी, एम एस यु आय चे पदाधिकारी, अल्पसंख्याक पदाधिकारी, ओबीसी सेल पदाधिकारी, शहरातून व तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन खरात तर प्रस्ताविक राजेश मापारी यांनी केले
.jpg)