Breaking Ticker

No title

 *आज गोदाकाठच्या अखंड मराठा समाजाची एकजुट झाली, १२३ गावची अंबड तहसिल कार्यालयात प्रचंड गर्दी*

---बिड जिल्हा प्रतिनिधी 

बाळराजे जाधव -----                --------         --------


*२९ आँगस्टला* मराठा आरक्षणासाठी भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे... जालना जिल्ह्यातील व बीड, संभाजीनगर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील गोदाकाठच्या १२३ गावच्या वतीने, आज सर्व गावचे मुख्य प्रतिनिधी बांधव प्रचंड संख्येने मा. अंबड तहसिलदार साहेबांना आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते...!

गोदाकाठच्या शहागड येथे २९ आँगस्टला महाराष्ट्रातील मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी *भव्य जनआक्रोश* आंदोलन करण्याची गोदापट्यात जय्यत तयारी सुरू आहे...!


 गोदाकाठचे १२३ गावे प्रचंड संख्येने सहभागी होऊन, हे आंदोलन *रेकॉर्डब्रेक* आंदोलन होणार आहे... अख्खे गावची गावेच आंदोलनात सहभागी होतील, अशी जंगी तयारी प्रत्येक गावातील मराठे करत आहेत...!

आम्ही गोदाकाठचे मराठे आता आरक्षण मिळवणारच...

*कारण इथे प्रश्न मराठा समाजाच्या मुलांच्या अस्तित्वाचा आहे*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.