Breaking Ticker

अवैध गुटख्यासह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त

 


मलकापूर मध्यप्रदेशमधून महाराष्ट्राच्या सिमेलगत गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या काही वर्षामध्ये पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विकणाऱ्या टोळींच्या मुसक्या वेळोवेळी आवळल्या आहेत. २२ नोव्हेंबर रोजी अवैधरित्या गुटखा घेवून जात असल्याची माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी ९ लाखाचा गुटखा सामानासह जप्त केला.

याबाबतची माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून एक वाहन गुटखा नेणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून एमआयडीसीजवळील टोल नाक्यावर पोलिसांनी पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. यावेळी मुक्ताईनगर येथूनमलकापूरकडे येणारे एक पीकअप वाहन पोलिसांनी थांबवले. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू गुटखा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश मधुकर कटारे (वय २९) आणि विजय धोंडुराम तापडीया (वय ४७) दोघेही रा. रामनगर, रिसोड, जि. वाशीम यांना ताब्यात घेतले. तसेच गुटख्यासह पिकअप वाहन असा ९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे यांच्या फिर्यादवरून एमआयडीसी पोलिसांनी अप.क्र. १७१/२०२३ भादंवि कलम ३२८, २७२, २७३, १८८ सह अन्न सुरक्षा मानंकाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.