Breaking Ticker

देवधाबा ग्रामपंचायत उपसरपंचाची आज निवड ! सरपंच यांच्या अध्यक्षतेत होणार कार्यालयात सभा

 

     देवधाबा : येथील उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी नवनियुक्त सरपंच देवकुमार कैलास सोळंके राहतील.उपसरपंचपदाच्या प्रक्रियेमुळे निवड गावखेड्यातील राजकारण परत एकदा ढवळून निघाले. जागोजागी मतदारांमध्ये कोण होणार उपसरपंच? यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले. आता उपसरपंच निवड मात्र त्यांच्या हातात नसून त्यांनी निवडून दिलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या हाती आहे.

देवधाबा ग्रामपंचायतच्या ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थन प्राप्त प्रगती पॅनलचे सरपंच व ७ सदस्य विजयी झाले. त्यांच्याच गटाचा एक सदस्य आता उपसरपंच होणार असल्याचे निश्चित आहे.मात्र, त्यामध्ये नेमका कोण? यासाठी मोठी खलबते होऊ शकतात किंवा दोन ते तीन लोकांना वेळोवेळी संधी देऊन सर्वांचे समाधान साधले जाऊ शकते. पहिला उपसरपंच होण्याचा मान कुणाला मिळतो ते पाहणे औत्सुक्याचे आहे.शिवाय दोन अपक्ष सदस्य निवडून आल्याने ते सत्ताधाऱ्यांसोबत की विरोधी गटात हेसुद्धा या निवडणुकीतून दिसून येणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.