Breaking Ticker

अनमाळ येथे अवैध रेती चोरी करणाऱ्या वाहतुकी ट्रॅक्टर वर कारवाई




माहूर प्रतिनिधी प्रविण बरडे 


माहूर अनमाळ परिसरात अवैध रेती वाहतुकीवर तहसील प्रशासनाने मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. ही कारवाई तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार व त्यांच्या चमुने करीत दोन ट्रॅक्टर जप्त करीत तहसील कार्यालय परीसरात जमा करण्यात आले आहेत.


दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आनमाळ परीसरात बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तहसील प्रशासनाला मिळताच तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार कैलास जेठे, तलाठी चंद्रकांत बाबर, यादव यांच्यासह त्या गावचे कोतवाल, पोलिस पाटील यांनी घटनास्थळी पोहचुन दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यावेळी परीस्थिती गंभीर होण्याचे संकेत पथक प्रमुख कैलास जेठे यांना मिळाल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण करीत जप्त केलेले दोन ट्रॅक्टर पोलिस संरक्षणात तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले, गौण खनिज अधिनियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथक प्रमुख कैलास जेठे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.