Breaking Ticker

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



प्रतिनिधी प्रवीण बरडे 

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.येथे विद्यार्थांची विविध कला गुण दर्शन, डान्स, एकांकिका, विविध स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री पहूरकर मधुसूदन दिगंबराव हे होते.उदघाटक व प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नागरिक श्री श्रीनिवासजी जाधव पाटिल, माजी गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्रजी जाधव सर, श्री बजरंगजी वाडगुरे सर्कल प्रमुख, दिलीपभाऊ भोसले, माजी मु.अ.श्री बोंतावार आनंदराव सर, प्राचार्य संगीता देवी महाविद्यालय दहेली तांडा श्री आडे सर, प्रा.मुडे सर,जि.प.मु.अ.दहेली श्री बि.डी.जाधव सर व मारोती गुरनुले व विशेष अतिथी म्हणून प्रत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशभाऊ कचकलवार यांची उपस्थिती होती.

 मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व प्रस्तावित श्री सतिश राऊत सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य,कला अस्विकार दाखवत श्रोत्यांना खिळवून ठेवले.श्रोत्यांनी आपल्या मुला मुलींना भरपुर बक्षीस देऊन आनंद द्विगुणित केला. विशेष मार्गदर्शन श्री रविंद्र जाधव सर यांनी केले तर सुत्र संचालन श्री हुडेकर सर,व विद्यार्थीनींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मोरे सर, श्री कल्याणी सर, राऊत सर,वाडकर सर,शेंदलवार सर,मोकासवाड सर, ऋषिकेश पहूरकर, तानाजी गुरणूले सर यांनी परीश्रम घेतले.व आभार मु.अ.श्री पहूरकर एम.डी.सर यांनी मानले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.