Breaking Ticker

इस्रोच्या भेटीसाठी अर्जुन पवार ची निवड अति दुर्गम भागातील मौजे तांदळा गावाचा आदर्श ठरला अर्जुन पवार

 




श्रीक्षेत्र माहूर प्रवीण बरडे 

माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरदऱ्यात वसलेल्या तसेच एकेकाळी नक्षल चळवळीने गाजलेल्या मौजे तांदळा येथील अर्जुन पवार याची राज्यस्तरीय निवड परीक्षेतून बेंगलोर येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट देण्यासाठी निवड झाल्याने अर्जुन पवार यांचे गावकऱ्यासह तालुका भरातून अभिनंदन होत आहे

 वडिलांचे छत्र हरवलेल्या अर्जुन नारायण पवार याची आई मोलमजुरी करते तर मोठा भाऊ बारावीत शिक्षण घेत आहे शिक्षणाची आवड असल्याने आई मालाबाई पवार हिच्याकडे जिद्द धरत त्याने इयत्ता नववीत आमणी तालुका महागाव येथील टी जी देशमुख माध्यमिक आश्रम शाळा येथे प्रवेश घेतला शिक्षण सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड परीक्षेतून भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो बेंगलोर येथे भेटीसाठी त्यास पात्र ठरविण्यात आले


या भेटीचा संपूर्ण खर्च शासनामार्फत करण्यात येत असून, अर्जुन पवार यांनी आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन करून शाळेचे, पालकांचे आणि संपूर्ण तांदळा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत कार्यालय तांदळा,

सर्व शिक्षकवृंद, तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्ष ग्रामस्त

यांच्याकडून अर्जुन नारायण पवार यांचे भरभरून कौतुक शुभेच्छांचा वर्षावहोत असून अर्जुनचे हे यश गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.