पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रविण वाघमोडे
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. आज पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार?
जिल्हा परिषद पुणे एकूण संख्या ७३ आहे यापैकी राष्ट्रवादी ५१, भाजप १०, शिवसेना (उबाठा) ०६, शिवसेना ०५, राष्ट्रवादी (श प) ०१ असे पक्षीय बलाबल सध्या आहे त्यामुळे राष्ट्रवादीची एखादी सत्ता पुणे जिल्हा परिषद वर आली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये १३ पंचायत समिती आहेत त्यापैकी ०९ पंचायत समितीवर राष्ट्रवादी सत्ता आले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील प्रथमच दत्तात्रय भरणे कृषिमंत्री व हर्षवर्धन पाटील माजी मंत्री यांनी एकत्र येत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढले यामध्ये इंदापूर तालुक्यातील ०८ जिल्हा परिषद व १६ पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत या ठिकाणी भाजपा व अन्य कोणतेही पक्षाला खाते उघडता आले नाही.
इंदापूर तालुक्यातील निकाल खालील प्रमाणे
१.भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गट सौ मेघना तुकाराम बंडगर, २.पळसदेव बिजवडी गट सौ हर्षदा दीपक जाधव, ३.निमगाव केतकी शेळगाव गट सौ सोनाली तुषार जाधव, ४.वडापुरी माळवाडी गट श्री जगदाळे यशराज आप्पासाहेब, ५.बोरी वालचंदनगर गट सौ निर्मला सागर मिसाळ, ६.सणसर लासुर्णे गट माधुरी सागर भिसे, ७.काटे लाखेवाडी गट श्री श्रीमंत पोपट ढोले, ८.बावडा लुमेवाडी गट अंकिता हर्षवर्धन पाटील तर
पंचायत समिती १.भिगवण गण सौ हेमा पद्माकर माडगे, २.शेटफळगडे गण श्री जितेंद्र प्रल्हाद वनवे, ३.पळसदेव गण सौ कीर्ती प्रवीणकुमार काळे, ४.बिजवडी गण श्री दिलीप माणिक भिसे, ५.निमगाव गण रणजीत मनोहर भिंग, ६.शेळगाव गण श्री जयकुमार गोपाळ कारंडे, ७.माळवाडी गण सौ कल्पना विष्णू पाटील, ८.वडापुरी गण अर्चना अजित खबाले, ९.बोरी गण चि श्रीराज दत्तात्रय भरणे, १०.वालचंदनगर गण सौ अनिता नंदू सोनवणे, ११.सणसर गण सौ ज्योत्सना मोहन सुरुडकर, १२.लासुर्णे गण श्री हर्षवर्धन मधुकर लोंढे, १३काटी गण श्री बापू लिंबाजी शेंडे, १४.लाखेवाडी गण सौ विमल किसन काळे, १५.बावडा गण सौ धनश्री किरण पाटील, १६.लुमेवाडी गण श्री शिवाजी विजयसिंह मोहिते यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांच्याही मुलांची राजकारणात एंट्री झालेली पाहावयास मिळाली.
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीनी ज्याप्रमाणे सत्ता काबीज केले त्याचप्रमाणे इंदापूर पंचायत समितीत ही सत्ता काबीज करण्यात दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांना यश आलेले पाहावयास मिळाले.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निकालाचे वैशिष्ट्य म्हणता येईल ०८ ही जागा साधारण दहा हजाराच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्याच प्रमाणे जागा ही एखाद दुसरा अपवाद वगळता मोठ्या फरकाने विजयी झालेले दिसतात.
