Breaking Ticker

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो विशेष शिबिराचा ढाकणी येथे प्रारंभ


*गोंदिया* :

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष रासेयो शिबिर 2025–26 चे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा, ढाकणी येथे श्री. राजेंद्र जैन सचिव व श्री. निखिल जैन संचालक गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया यांच्या मार्गदर्शनात उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पुरुषोत्तम पटले सिव्हिल सर्जन के.टी.एस.हॉस्पिटल, गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी रासेयो स्वयंसेवकांनी आरोग्यजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच सेवाभावाने कार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोज कुमार पटले, प्रभारी प्राचार्य, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया होते. यांनी सांगितले की युवक हे आपल्या भारताचे भविष्य आहेत आणि त्यांनी डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल केली पाहिजे. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुनेश्वर मेश्राम गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, गोंदिया उपस्थित होते. त्यांनी शिक्षणजागृती व ग्रामविकासात योगदान देण्याचे आवाहन रासेयो स्वयंसेवकांना केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्री. पंकज चौधरी (उपसरपंच, ग्रा. पं. ढाकणी), डॉ. बबन मेश्राम (जिल्हा समन्वयक रासेयो), श्रीमती कुंदा मेंढे (ग्रामविस्तार अधिकारी), श्री. एल. एस. कवाडे (मुख्याध्यापक), श्री. सुनील हिरापूरे , डॉ. निगमदास गौतम व श्रीमती समरूता लिल्हारे (सदस्य, ग्रा.पं. ढाकणी) उपस्थित होते. 

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. के. पी. घोषाल (रासेयो कार्यक्रम अधिकारी) यांनी केली. आभार प्रदर्शन प्रा. राजकुमार पटले (रासेयो कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. सूत्रसंचालन श्री. दानेश खान रासेयो स्वयंसेवक यांनी केले.

विशेष रासेयो शिबिर 2025–26 मध्ये महाविद्यालयातील डॉ. आनंद मोरे , प्रा. खुशबू पारधी , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच 75 रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शिबिराच्या कालावधीत आरोग्य तपासणी, रक्तदान, स्वच्छता मोहीम, विविध जनजागृती व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.