Breaking Ticker

वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा



कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फ दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या "दृष्टीपासून परिणामापर्यंत: लिंगभेद कमी करून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितची पुनर्परिभाषा करणे" या जागतिक संकल्पनेनुसार संशोधन आधारित पोस्टर प्रदर्शन व सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील लिंग विषमता याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच संशोधन व नेतृत्व क्षेत्रात महिलांचे समतोल प्रतिनिधित्व अधोरेखित करणे असुन आरोग्य, संशोधन, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, वैज्ञानिक उद्योजकता या प्रमुख क्षेत्रांमध्ये लिंगभेद कमी करणे होय. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड उपस्थिती होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून वैज्ञानिक संशोधनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्राध्यापक वर्गानेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले. विज्ञान क्षेत्रात महिलांचे सशक्तीकरण हे समावेशक आणि नवोन्मेषी भविष्यासाठी अत्यावश्यक आहे, हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

तृतीय वर्षं भौतिकशास्त्रच्या विद्यार्थिनी आकांक्षा कुलकर्णी, कल्याणी कोळी, रुपाली तावडे, सुवर्णा गिरासे, देवयानी मोरे, शैख मिसबाह नाज, प्रणाली पाटील, शितल ठाकरे आणि रुचिका कोळी या विद्यार्थिनींनी दोन संशोधन आधारित पोस्टर सादरीकरण केले. पहिल्या पोस्टरमध्ये जागतिक व भारतीय स्तरावरील STEM क्षेत्रातील लिंग प्रतिनिधित्व, सांख्यिकीय विश्लेषण, रचनात्मक अडथळे आणि महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. दुसऱ्या पोस्टरमध्ये मेरी क्युरी, सुनीता विल्यम्स आणि डॉ. टेसी थॉमस यांसारख्या प्रेरणादायी महिला वैज्ञानिकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष ते तृतीय वर्षं भौतिकशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

हा कार्यक्रम प्राध्यापक पठाण इरम फतेमा यांच्या समन्वयातून तसेच भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक डॉ. बी. वाय. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय प्रा. डॉ. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव माननीय ताईसाहेब वर्षाताई जाधव, संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव व संस्थेचे समन्वयक श्री. संजय राजपुत यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.