Breaking Ticker

माहूर येथील भूमी अभिलेख चे कर्मचारी संपावर




 श्रीक्षेत्र माहूर प्रवीण बरडे 


जमिनीची मोजणी आणि हद्द निश्चिती करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 'समान काम, समान वेतन' या तत्त्वानुसार तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी असहकार आंदोलन करण्याचा निर्णय भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने घेत आज पासून आंदोलन सुरू करण्यात आले याबाबतचे निवेदन 18 फेब्रुवारी रोजी माहूरचे तहसीलदार अभीजित जगताप यांना देण्यात आले 


भूमी अभिलेख विभागाचा कणा असलेल्या 'भूकरमापक' पदासाठी शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी पदवी पदविका आहे. त्यांचे काम पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाचे असूनही त्यांना लिपिक वर्गीय वेतन दिले जाते. दुसरीकडे वन विभाग आणि महापालिकांमध्ये याच पदाला तांत्रिक वेतनश्रेणी लागू आहे. विशेष म्हणजे 'मॅट'ने अद्याप कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊनही शासनाने अंमलबजावणी न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे

१८ फेब्रुवारी मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून कामकाज सुरू करण्यात आले २० फेब्रुवारी मोजणी काम पूर्णपणे बंद. २३ ते २६ फेब्रुवारी सामूहिक रजा आंदोलन. २७ फेब्रुवारी पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा' २ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने तहसीलदार अभिजीत जगताप यांना एम. जी. कदम प. भू.डी. बी. आईटवार क.ली.

एम व्ही चौधरी भूमापक एच. डी डाखोरे आ. जा. लि.एम. जी. मरशिवणे भूमापक यांनी निवेदन दिले आहे. आंदोलनामुळे जमिनीची हद्द मोजणी, कोर्टाच्या मोजण्या, वाटणीचे नकाशे, सिटी सर्व्हे व शासकीय प्रकल्पांच्या महामार्ग, धरणे भूसंपादनाच्या मोजणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.