Breaking Ticker

शहाद्यात 'वयोश्री' योजनेसाठी दोन हजार जणांची नाव नोंदणी व तपासणी संपन्न.एक हजार जणांना मिळणार मोफत साधने.



शहादा,दि.१८ (प्रतिनिधी)

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आमदार राजेशदादा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून शहादा शहरात 'राष्ट्रीय वयोश्री योजने' अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी भव्य मोफत सहायक साधन तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात एकाच दिवशी सुमारे दोन हजार महिला व पुरुष लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली असून त्यांपैकी एक हजार जणांना महिनाभरात साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

     भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीमको) कानपूर यांच्या तांत्रिक सहयोगाने आयोजित हे शिबिर शहादा नगर परिषद शाळा क्रमांक ९ व १६ श्रीराम कॉलनी येथे पार पडले. वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक उपकरणे मिळावीत, या उद्देशाने आ. राजेशदादा पाडवी यांनी या विशेष शिबिराचे नियोजन केले होते.या योजनेअंतर्गत तपासणी पूर्ण झालेल्या एक हजार पात्र लाभार्थ्यांना पुढील साधनांचे मोफत वाटप केले जाणार आहे.घडीचे वॉकर, चालण्याची काठी, चाकांची घडीची खुर्ची (व्हीलचेअर), श्रवणयंत्र, चष्मा, कमोड खुर्ची.संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा आणि कमरेचा पट्टा.बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासूनच ज्येष्ठांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. नोंदणीसाठी ६० वर्षांवरील वयोगटाचा पुरावा, आधार कार्ड, दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड आणि दोन फोटो ही कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली होती. 'अलीमको'च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येकाची तपासणी करून आवश्यक त्या साधनांची नोंद केली.दरम्यान,"तालुक्यातील एकही पात्र ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग बांधव साधनांवाचून वंचित राहू नये, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे अनेकांचे जीवन सुसह्य होईल."असे आवाहन आ. राजेशद पाडवी (शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघ) यांनी केले आहे.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील,पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे,वयोश्री योजनेचे डॉ किरण पावरा, तालुका अध्यक्ष विश्वास ठाकरे,नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, ललित छाजेड,हरीश पाटील,मुनीश जगदेव,दिपक कोळी,सागर मराठे,रुपाली पवार, चंद्रभान कदम,विनोद जैन,वदना भावसार, रमाशंकर माळी,गणेश पाटील,कार्तिक आप्पा,सुभाष वाघ,सचिन पावरा,सुकलाल रावताळे,प्रशात कुलकर्णी,स्विय सहाय्यक हेमराज पवार,दिपक जयस्वाल,अनिल ठाकरे,प्रितेश भावसार.यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सर्व गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.येत्या महिनाभरात एका भव्य कार्यक्रमाद्वारे एक हजार पात्र नोंदणीकृत लाभार्थ्यांना साहित्याचे प्रत्यक्ष वाटप केले जाणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.