Breaking Ticker

औद्योगिक प्रशिक्षण व उद्योजकता मार्गदर्शन.



प्रतिनिधी शहादा 

       येथील वसंतराव नाईक कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत औद्योगिक प्रशिक्षण व उद्योजकता मार्गदर्शन या विषयावरती तनय ऍग्रोनिक्स शहादा चे उद्योजक माननीय सौ डॉ मंजुळाताई पाटील व संचालक निखिल पाटील यांनी स्वतः उभ्या केलेल्या उद्योगासंदर्भात सखोल माहिती विद्यार्थ्यांना देऊन प्रेरित केले. सुरुवातीच्या संकटकालीन विषय म्हणजे आर्थिक भांडवल, नियोजन, प्रोजेक्ट सर्वे, प्रत्यक्ष अभ्यास, प्रोसेसेस, प्रॉडक्ट तयार करणे व सर्वात शेवटी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मार्केटिंग यासंदर्भात विविध पैलूंचा अत्यंत खोलात जाऊन प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. विशेष करून शेती संबंधित लागणारे जैविक कीटकनाशके,  मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पद्धतीने कसे तयार करावयाचे असते यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शेतीवर आधारित शेतकऱ्यांचा व आधुनिक गरजा ओळखून इतर अनेक व विविध उद्योगांचे मार्गदर्शन देखील केले व विद्यार्थ्यांना नोकरी व्यतिरिक्त उद्योजक होण्यास प्रेरित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव माननीय भैय्यासाहेब संजयजी जाधव तसेच प्राचार्य डॉक्टर डी डी राठोड यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर बी मराठे, पाहुण्यांच्या परिचय डॉ एस डी खैरनार प्रस्तावना डॉ के एल पाटील तसेच आभार प्रदर्शन डॉ ए व्ही पाटील यांनी केले. यावेळी डॉ बी वाय बागुल, प्रा गणेश पडघन, प्रा उर्वशी पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.