प्रतिनिधी शहादा
वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार व जनकल्याण रक्त केंद्र साखळी पुणे तर्फे थेलेसिमिया व सिकलसेल मुक्त भारत जनजागृती अभियाना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून रणजीत राजपूत, जन कल्याण ब्लड सेंटर नंदुरबार चे संचालक सचिन नरवाडे, प्राचार्य मोरे एम.बी ,उपप्राचार्य पवार जे बी उपस्थित होते.
थेलेसिमिया हा आई-वडिलांकडून मिळालेला अनुवंशिक रक्तदोष आहे याचे दोन प्रकार आहेत , थेलेसेमिया मायनर, थेलेसिमिया मेजर थेलेसिमिया मायनर हा रोग नसून शरीरातील लाल रक्तपेशीच्या दोष गुणसूत्र पैकी एक गुणसूत्रामधील दोष असतो यात हिमोग्लोबिन सामान्य व्यक्तींपेक्षा थोडा कमी असतो मात्र त्या व्यक्तीला कुठल्याही औषधोपचाराची गरज भासत नसते व तो सामान्यपणे जीवन जगतो.
थेलेसिमिया मेजर यामध्ये लाल रक्तपेशींच्या दोन्ही गुण सूत्रांमध्ये दोष असल्यामुळे रुग्णास जन्मापासून शेवटपर्यंत बाहेरून रक्त द्यावे लागते जे खूप खर्चिक वेदनादायीक असते तसेच त्या रुग्णाचे आयुष्य फक्त पंधरा ते वीस वर्षांपर्यंत असते या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली व रक्तदान कोण करू शकतो रक्तदानाचे फायदे काय आहेत व शंका व समाधान याविषयी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. शिबिरात एकूण 60 विद्यार्थ्यांची रक्त चाचणी करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ओगले जी व्ही ,आभार कार्यक्रम अधिकारी पवार एस बी यांनी मानले.
