शहादा प्रतिनिधी
समाजासाठी प्रत्येक पिढीने आपापल्या परीने योगदान दिले आहे.समाजाचे असंख्य विषय आहेत ते सोडविण्यासाठी राजकीय रंग बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. समाज बांधवांनी केलेल्या मागणीनुसार येत्या काळात लवकरच समाज बांधवांचा मदतीने शहरात पाटीदार भवन कार्यालय, सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक, समाजाच्या कुलदेवतांसाठी सुसज्ज पाटीदार कुलदैवत धाम उभारण्यात येईल असे आश्वासन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत दादा पाटील यांनी लेवा पाटीदार समाज बांधवांना दिले.
लेवा पाटीदार उन्नती मंडळातर्फे शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत दादा पाटील यांची त्यांचा मोहिदा रस्त्यावरील कार्यालयात समाज बांधवांनी भेट घेऊन लेवा पाटीदार समाजापुढील अडचणी,विविध प्रश्नांबाबत पुढाकार घेऊन चालना देण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित असंख्य समाज बांधवांसमोर श्री पाटील यांनी समाजाच्या उन्नतीसाठी व भरभराटीसाठी लवकरच राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत समाज बांधवांना आश्वासित केले. यावेळी उन्नती मंडळातर्फे श्री पाटील यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णकृती पुतळा व कुलदेवता तसेच प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.यावेळी समाजातील प्रश्नांबाबत लोकेश पाटील (प्रकाशा), हर्षल पाटील ( खेड), मनोज चौधरी (बामखेडा), हितेंद्र पाटील (शहादा), महेंद्र पाटील (तळवे),मुकेश पाटील (शहादा) आदींसह अन्य समाज बांधवांनी मनोगतातून समाजासमोरील येणाऱ्या विविध अडचणी, प्रश्न व समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष श्री पाटील यांना आवाहन केले. यावेळी शिरपूर, शहादा ,खेतिया ,नंदुरबार, तळोदा , निझर, वेळदा सह परिसरातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाई पाटील यांनी केले.
समाजाच्या मागण्या....
शहर आणि ग्रामीण लेवा पाटीदार समाज बांधवांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच समाजातील असंख्य गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या व्यवस्थेसाठी समन्वय यंत्रणा उभारणे. लेवा पाटीदार समाज परिसरातील १७० गावांमध्ये विखुरला असून त्यांचे संपूर्ण माहिती साठी रजिस्ट्री तयार करणे.,समाजातील जेष्ठांसाठी आनंदाश्रम उभारणे., समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हक्काचे उन्नती मंडळ उभारणे., परिसरातील व जगभरातील लेवा पाटीदार बांधवांचे प्रत्येक होईल असे समाजातील सर्व कुलदेवतांचे पाटीदार धाम उभारणे.,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारणे. समाजातील जाज्वल्य इतिहासाचे जतन करण्यासोबतच भविष्यातील समाजाच्या पिढीला आधार देण्याचा दृष्टिकोनातून मागण्यांची पूर्तता करण्याचे आवाहन लेवा पाटीदार उन्नती मंडळातर्फे करण्यात आल्या आहे.
राजकीय किनार लावू नये.....
समाजात ज्या लोकांना समाजहिताचे काम करायचे असेल त्यांना ते करू द्यावे. मतभेद करू नये. ग्रामीण व शहरातील नागरिकांनी समाज उन्नतीसाठी एकत्रित यावे. सर्व समाज बांधवांनी एकत्रित प्रगत सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी प्रयत्न करू परंतु समाज उन्नतीचे काम करीत असताना त्यात राजकीय किनार लागायला नको, समाज एक संघ असायला पाहिजे. समाजाचे अध्यक्ष, त्यांच्या पदाच्या मान सगळ्यांनी ठेवला पाहिजे. समाजाचे विषय असतील तर राजकीय रंग बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. आपल्यामुळे समाज नसून समाजामुळे आपण आहोत ही भावना प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे असे आवाहनही श्री पाटील यांनी केले.
२४ एप्रिलला पाटीदार समाजाचे कार्यालय उद्घाटन.
३१ ऑक्टोंबर २०२६ ला पाटीदार धाम जागा निश्चिती तसेच सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचे भूमिपूजन.
कार्यालयाच्या उद्घाटना वेळी राजकीय मतभेद न ठेवता सर्व समाज बांधवांना उपस्थितीचीचे श्री पाटील यांचे आवाहन.
दुर्बल घटक आर्थिक मंडळ, समाजाचे रजिस्ट्री, उन्नती मंडळ, आनंदाश्रम याही गोष्टी पूर्णत्वाकडे नेल्या जातील असेही अभिजीत पाटील यांनी स्पष्ट केले.
