Breaking Ticker

युवकमित्र संस्थेतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन



प्रतिनिधी शहादा

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार यांच्या वतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुल्या गटासाठी असून नंदूरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी केले आहे.


*स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत:*

१)डॉ. बाबासाहेबांचे जलनीतीविषयक विचार आणि आज २)डॉ. बाबासाहेब आंबेडकर – परिवर्तनाचे अग्रदूत, ३)डॉ. बाबासाहेब आंबेडकर – आपले आदर्श, आपले प्रेरणास्थान, ४)क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि त्यांचे कृषिविषयक विचार, ५)महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार – काळाची गरज,६)महात्मा फुले – आजच्या समाजसुधारकांचे प्रेरणास्थान

     स्पर्धकांनी दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर किमान ३००० शब्दांचा निबंध कागदाच्या एका बाजूला सुवाच्छ अक्षरात लिहून किंवा टायपिंग करून त्याची PDF प्रत दिनांक १० एप्रिल २०२६ पर्यंत व्हॉट्सॲप क्रमांक 9529125396 वर पाठवावी.

स्पर्धेतील उत्कृष्ट प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे र.₹११०१/- र.₹७०१/- आणि र.₹५०१/- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह तसेच पुस्तके देण्यात येणार आहेत. प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांचा शहादा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल.

निबंध लेखनात संशोधनपर, अभ्यासपूर्ण, वैचारिक व संदर्भाधारित मांडणीस प्राधान्य दिले जाईल. पारितोषिक निवडीसंदर्भात परीक्षक समितीचा निर्णय अंतिम राहील. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.