शहादा प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आणि नंदुरबार जिल्ह्याचे नेतृत्व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांचे संघटनात्मक कुशल नेतृत्वात गांव लोणखेडा ठेंबली, उंटावद, होळ, अवघा, अनरद, कवळीद, आसुस या गावातील असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी आज शहादा येथे शिवसेना कार्यालयात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या गळ्यात स्कार्प टाकत प्रवेश करुन घेतला, प्रवेश करणारे कार्यकर्ते बिरसा मुंडा संघटनेचे संस्थापक भरोसा मोरे व ठेंबली गावाचे सरपंच आझाद ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत, काही दिवसांपूर्वी बिरसा मुंडा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरोसा मोरे व ठेंबली गावाचे सरपंच आझाद ठाकरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता त्यांचेच असंख्य, शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संघटनेच्या दृष्टिकोनाने शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, भरोसा मोरे व सरपंच आजार ठाकरे यांनी युवा कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवला त्यामुळे आज शिवसेना पक्षांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश झाला म्हणून या तिघांचं मी शब्द स्मुनांनी कौतुक करतो, भविष्यात जिल्हास्तरावरील कुठल्याही अधिकाऱ्याने आपल्या कामात आडकाठी आणली तर या तिघांसोबत माझ्याशी संपर्क साधावा व आपल्या गावाचा विकास करावा असे त्यांनी आपल्या मनोगत शब्द व्यक्त केली. या पक्ष प्रवेशा वेळी जेष्ठ नेते जहिर शेख, शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, जिल्हा उपप्रमुख छोटू पाटील, नंदुरबारचे नगरसेवक कुणाल वसावे, भरोसा मोरे, सरपंच आझाद ठाकरे, युवा राज बिरारे, सागर चौधरी आणि शहरातील शिवसैनिक उपस्थित होते.
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा शिवसैनिक ,स्वरूप लुकंड, महेश पाटील, अंकुश लोहार,गोपाल कोळी, मनोज जैन, ॲड. भोजेंद्र शिंदे, दिलीप पवार, कौस्तुभ मोरे, मयूर जैन, जगदीश पाटील यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचलन शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे आणि प्रस्तावना भरोसा मोरे यांनी केली
