Breaking Ticker

पोलिस अधिकारी कार्यालयात शांतता कमेटीची बैठक पार




शहादा प्रतिनिधी 

      पोलिस प्रशासन सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. समाजात शांतता व सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी केवळ पोलिसच नव्हे तर शांतता कमेटीचे  सदस्य आणि ज्येष्ठ नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरुणांना चुकीच्या कृत्यांचे परिणाम समजावून सांगून सकारात्मक मार्गावर आणण्याचे काम सर्वांनी मिळून करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांनी केले.

      आगामी सण-उत्सवांच्या

पार्श्वभूमीवर शहादा शहरात शांतता, सौहार्द आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने शहादा पोलिस ठाण्याच्या वतीने सोमवारी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शांतता कमेटीची बैठक पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार होते. मंचावर सरकारी वकील ॲड.स्वर्णसिंह  गिरासे, पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, महावितरणचे उपअभियंता अशोक पाटील, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांसह विविध विभागांचे अधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी सरकारी वकील स्वर्णसिंह गिरासे यांनी सन उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आनंदाने सण साजरा करतात. यावेळी अफवांना लगाम लावला पाहिजे. शांतता कमिटीच्या सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांना , तरुणांना सन उत्सव शांततेत साजरा करण्याचे सोबतच सोशल मीडियाच्या वापराबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि महावितरणचे उपअभियंता अशोक पाटील  यांनी सणासुदीच्या काळात शहरातील स्वच्छता, नमाज पठण परिसराची साफसफाई तसेच अखंड वीजपुरवठा राखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्याचे आश्वासन दिले.नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत शांतता समितीचे सदस्य प्रा. लियाकत अली सय्यद, अनिल भामरे, प्राचार्य महेमूद खाटीक, सुनील गायकवाड, डॉ. विकार खान, ॲड . साजिद पठाण यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन आणि आभार पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी मानले. या बैठकीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वयाचे वातावरण निर्माण झाले.


शहादा: शांतता कमेटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार. समवेत पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपअभियंता अशोक पाटील, सरकारी वकील ॲड. स्वर्णसिंह गिरासे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.