शहादा — शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर, शहादा येथे मराठी विषयाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता नववी मधील ‘मराठी विषयाचा विश्वकोश’ या स्थूलपाठात असलेला उपघटक ‘केशभूषा’ या विषयावर आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने केशभूषेचे प्रशिक्षण देण्यात आले. शहादा येथील अर्चना ब्युटी पार्लरच्या संचालिका श्रीमती अर्चना पाटील यांनी विद्यार्थिनींना विविध केशभूषा प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
*यावेळी बोलताना संकुलाच्या प्राचार्या श्रीमती सुरेखा पाटील यांनी, “केशभूषा म्हणजे केसांची आकर्षक मांडणी व प्रसंगानुसार केलेली रचना होय,” असे सांगत विद्यार्थिनींना केशभूषेचे महत्त्व पटवून दिले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये नवीन कौशल्यांची जाणीव निर्माण झाली तसेच स्वावलंबनाची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाची संकल्पना श्री सुरज पाटील सर यांची होती. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मराठी विषय शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षिका भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमात शाळेतील एकूण ५१ विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थिनींनी विविध केशभूषा व वेशभूषांचे आकर्षक सादरीकरण केले. त्यातून खालीलप्रमाणे विजेत्यांची निवड करण्यात आली —
*प्रथम क्रमांक — प्रणाली राहुल आगळे
द्वितीय क्रमांक — नंदिनी कैलास निकुंभे
तृतीय क्रमांक — श्रेया अमित बर्डे
उत्तेजनार्थ — चंचल किशोर चौधरी, नव्या जितेंद्र पाटील*
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
