Breaking Ticker

पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत डिजे वाजणार नाही चा संकल्प




श्रीक्षेत्र माहूर प्रवीण बरडे 

येणाऱ्या पवित्र होळी सन आणि रमजान तसेच बाबा सोनापिर उर्स निमित्य माहूरच्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत यापुढे कुठल्याही सण उत्सव काळात डीजे वाजणार नाही असा संकल्प घेण्यात आला 

श्रीक्षेत्र माहूर शहर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून येथे सण-उत्सवासह जयंती पुण्यतिथी यासह वर्षभर होणाऱ्या यात्रा महोत्सवात मिरवणुका निघत असतात तर लहान थोरांचे वाढदिवसही मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात या ठिकाणी छोट्या मोठ्या आवाजात डीजे वर गाणे यासह इतर भाषणे वाजविले जात असल्याने अनेक वेळा शांतता कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा प्रसंग उद्भवतो त्यामुळे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी उपस्थितांना डिजे वाजवू नका असे आवाहन केल्याने झालेल्या बैठकीत यापुढे डीजे वाजणार नाही असं संकल्प शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला

 या बैठकीत सपोनी शरद घोडके पो उप नी पालसिंग ब्राह्मण पोऊपनि संदीप अन्येबोईनवाड गोपनीय शाखेचे पोका गजानन चव्हाण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी सर ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने एड जगदीश अडकिने भाजपाचे अजय पवार काँग्रेसचे नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी सुनील वानखेडे अर्जुन पवार संतोष जग्गू नाईक पत्रकार इलियास बावाणी राज ठाकूर शंकर भालेराव पवन चव्हाण यांचे सह मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.