शहादा ( गणेश सोनवणे)
गुढीपाडवा सण हा हिंदू धर्मासाठी चांगले कार्य करण्याचा एक सण म्हणून ओळख आहे. साडेतीन मुहर्तापैकी पैकी एक असलेला गुढीपाडवा हा एक सण आहे. या सणाचा दिवशी वाहन खरेदी, घर खरेदी, शेती खरेदी किंवा नवीन वास्तूचे शुभारंभ दुकानाचे उद्घाटन असे कार्य होत असतात. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि उत्साहाच्या सण आहे जो हिंदू नववर्षाची सुरुवात करतो. हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो.
गुढीपाडवा हा सण मराठी नववर्ष म्हणून देखील साजरा केला जातो मराठी चैत्र महिन्यात पहिल्याच दिवशी याची सुरुवात होते. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतुच्या आगमनाची प्रतिक आहे या काळात झाडावरील जुनी सुकलेली पान गळून नवीन पालवी फुटत असते. झाडांना नवीन बहर येत असतो. जुने लोक या सणाविषयी बोलताना म्हणतात की मागील सर्व जुन्या व खराब आठवणी बाजूला सारून आयुष्याला नवीन सुरुवात करावी. नवीन वर्षाला वाईट गोष्टी त्यागून चांगल्याच्या स्वीकार करावा आयुष्यात गोडवा निर्माण करावा. थोडा मोठ्यांच्या आदर करावा. आणि अशा संस्कृतीमुळे महाराष्ट्राची व देशाची संस्कृती टिकून आहे. वसंत ऋतू मध्ये कडुनिंबाचे पाने आणि आंब्याच्या मोहर निसर्गातील या बदलाचे स्वागत करत असतात म्हणून गुढीला कडूनिंबाची पाने बांधले जातात. थोडक्यात म्हटले तर गुढीपाडवा हा आनंदाच्या नवीन सुरुवातीच्या आणि समृद्धीच्या सण आहे.
गुढीपाडवा हा सण विजय आणि समृद्धी साठी देखील प्रसिद्ध आहे. गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाच्या वनवास संपवून रावणावर विजय प्राप्त केल्यानंतर अयोध्येत परतल्यावर त्यांचे स्वागत गुढी उभारून करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अधर्मावर धर्माच्या विजय झाल्यामुळे हा सण साजरा करण्याच्या मानस आहे. त्यासोबत शालिवाहन राजाने शंका च्या पराभव केल्याच्या आनंदात देखील गुढी उभारली जाते अशी समजत आहे. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याची समज देखील आहे म्हणून त्या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीस ब्रह्मध्वज असे देखील म्हटले जाते.
या दिवशी घरातील सर्व मंडळी ब्रह्म मुहूर्तस उठून स्नान वगैरे आटोपतात महिला मंडळी घरासमोर सडा रांगोळी काढत असतात. मराठमोळे वस्त्र परिधान करून घरातील चांगल्या कामाला सुरुवात करत असतात. गुढी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा खिडकीत उभारले जाते काठीला रेशमी वस्त्र कडुनिंबाची पाने आंब्याचे डाहाळी आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्या उलटा ठेवला जात असतो. गुढीची पूजा करून तिला पुरणपोळीचे तथा गोड नैवेद्य दाखवले जात असते या दिवशी कडूनिंबाचे पाने खाण्याचे प्रथा आहे जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मराठ मोळे सण कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवतात व ही आजच्या काळची गरज आहे.