Breaking Ticker

सोनी गावामध्ये शेतकऱ्याची मनमानी

 


सुरेश साठवणे (प्रतिनिधी)

गोरेगाव तालुक्यातील सोनी गावात अनेक वर्षापासून कामधेनु वाप सहकारी संस्था मर्यादित रजिस्टर 867 नावाची संस्था जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांच्या नियंत्रणाखाली असून सदर संस्थेतील अध्यक्ष सचिव तसेच सोसायटीचे काही निवडक सभासद हे आठ ते दहा वर्षांपासून प्रशासनाला कोणतेही पूर्वसूचना न देता किंवा सदर सोसायटीतील बाकी एग्रीमेंट आणि डिमांड धारक सभासदांना विश्वासात न घेऊन सदर विषयाबाबत सभा किंवा ठराव न घेता तसेच शासनाचे नियमाचे उल्लंघन करून साय पण द्वारे बेकायदेशीर रित्या तळ्याचे पाणी आपल्या शेतातील रब्बी धान पिकासाठी एका प्रकारे पाण्याची चोरी करून घेऊन जात आहे सदर तलाव हे गावाच्या जंगलात गावाच्या जंगलाला लागले असून जंगलातील वन्य प्राणी गावातील पाळीव प्राणी यांना तलावातील पाणी पिणे सोयीचे होत असून वन्यप्राणी व तलावाच्या अवलंबून आहेत वर्षभरात तलावाचे पाणी असेल तर गावातील विहिरी शेतातील विहिरी बोरवेल्स यांना वर्षभर पाणी असू असते परंतु काही वर्षापासून मोजक्या लोक सोसायटीचे पदाधिकारी हे रब्बी हंगामात शेतीसाठी तळ्याचे पाणी नेत असल्याने उन्हाळ्यात तलावात जलसाठा उपलब्ध राहत नसून गावातील तसेच शेतीतील विहिरी पूर्वपणे आढळतात त्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिन्यात पाण्याकरता खूप समस्या उद्भवतात एकीकडे शासनाच्या धारण आहे आणि पाणी अडवा आणि पाणी जिरवा पण प्रशासनाने नियंत्रणाच्या खाली असलेले सोसायटीचे पदाधिकारी हे आपल्या स्वार्थासाठी गावातील नागरिक, शेतकरी, वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांच्या जीवाशी खेळ खेळतात एकंदरीत कुंपणच शेत खात आहेत अशी सोने गावाची अवस्था झालेली आहे सदर या गंभीर विषयात न्याय मिळणे करिता संबंधित विभागाला गावातील नागरिकांच्या सहमतीने पत्रव्यवहार करून झाला असून संबंधितावर आज पावतो कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने संबंधित व्यक्ती गावातील नागरिकांचे होत असलेले विरोध झुगारून त्यांच्या उर्मटपणे मनमानी कारभार कित्येक दिवसापासून सतत सुरू आहे संबंधित विभागाने त्या विषयाचे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून सोनी गावातील शेतकरी नागरिक व वन्य पाळीव प्राणी यांना न्याय द्यावा तसेच सदर तलावाची पाणी पूर्णपणे बंद करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी ही गावकऱ्याची चे शेतकरी यांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.