शहादा (दि. 18) - येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शहादा औद्योगिक वसाहतीतील कंचन कमला इंडस्ट्रीजला भेट दिली. कंचन कमला इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक आनंद जैन यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उद्योगात शेतमालावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर उत्कृष्टरित्या पॅकिंग करून शेतमाल कशा पद्धतीने देशातील मार्केटमध्ये तसेच आखाती देशांमध्ये पाठविला जातो याबाबत जैन यांनी माहिती दिली.
या उपक्रमात अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाचे 54 विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी.एम. गांगुर्डे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश निकम, व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विभाग प्रमुख प्रा. एस. एस. पवार, प्रा. एस.एल.भालेराव, डॉ. जी.एस. गवई, डॉ. जगदीश पाटील, प्रा. कौस्तुभ जहागीरदार आदी उपस्थित होते.
