संतोष वाठोरे (प्रतिनिधी सेनगाव )
दिनांक 18 मार्च 2026 सेनगाव.
सेनगाव येथे आंचल इंडेन गॅस एजन्सी समोर जनसामान्य माणसांच्या घरगुती गॅस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मागील काही दिवसापासून जागतिक बाजारपेठेत गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तसेच इजराइल व इरान या दोन देशाच्या युद्धामुळे भारतामध्ये गॅसचा थोडाफार दर वाढल्यामुळे जनसामान्य ग्राहक वर्ग चिंतेत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात असून आपल्याला गॅस मिळेल की नाही यामुळे यामुळे गॅस एजन्सीला चक्करा मारत आहेत. ज्यांच्या घरचा गॅस संपलेला आहे ते नागरिक एजन्सी समोर सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभे आहेत, आचल गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत व त्यांना लागली की मदत करत आहेत.
