Breaking Ticker

आ.डॉ.कुटे यांचे वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा सोनाळा द्वारे वृक्षारोपण



 सुमेध दामधर प्रतिनिधी 

      सोनाळा (12 मार्च 2026) : दिनांक ९ मार्च रोजी जळगांव जा.मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व मा.मंत्री डॉ.संजयजी कुटे यांचे वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा सोनाळा द्वारा शिक्षक कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले.डॉ.कुटे साहेबांना दिर्घ आयुष्य लाभो व त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभकामना महिला मोर्चा द्वारे या भगिनींनी दिल्या.९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोनाळा येथील शिक्षक कॉलनी येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला गेला.भाजपा महीला मोर्चा व नवदुर्गा महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबविले जातात. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे समाजात पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे असे मत सौ.वैशालीताई बोदडे भा.ज.पा. तालुका सरचिटणीस महिला मोर्चा यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सौ.ज्योतीताई लव्हाळे संचालक खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या.संग्रामपूर,श्रीमती पंधाडे,सौ.जनाताई भास्कर,श्रीमती तलोकार,सौ.वनमालाताई सुलताने, सौ.पार्वतीताई घट्टे,सौ. सुनिताताई राजनकर,सौ.शोभाताई गोतमारे,सौ.दिपालीताई पवार श्रीमती गोतमारे आदी महीला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.