Breaking Ticker

गहू MACS -6222 या वाणाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम

 


महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला अंतर्गत जिल्हा कार्यालय पुणे यांचेमार्फत दिनांक 10/03/2026 रोजी शेतकरी श्री.विलास देवकर, दहिटणे  तालुका - दौंड, जिल्हा- पुणे यांच्या प्रक्षेत्रावर महाबीज उत्पादित गहू  MACS -6222 या वाणाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळेस जिल्हा व्यवस्थापक, पुणे श्री पुरुषोत्तम फाटे यांनी सदर वाणविषयी,जैविक बुरशीनाशक , खते, नवीन उत्पादने महानींम , रॅपिड डिकोम्पोजर व महाबीजच्या कामकाजाविषयी सखोल अशी माहिती दिली तसेच कृषी क्षेत्र अधिकारी श्री. महेश शितोळे व श्री. अमरसिंह जगदाळे यांनी महाबीजच्या इतर जैविक उत्पादनांविषयी महत्त्वाची माहिती दिली.गहू MACS -6222 हे वाण आघारकर संशोधन संस्था,पुणे यांनी विकसित केलेले आहे. बागायती वेळेवर पेरणी केल्यास एकरी 22 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.तसेच याची चपाती देखील रुचकर होते त्यामुळे या वाणाबद्दल शेतकऱ्यांचां उत्तम प्रतिसाद मिळत आहे.तरी उपस्थित शेतकऱ्यांनी सदर वाणाबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी संदीप कृषी सेवा केंद्र ,दहिटने याचे संचालक श्री.संदीप कुल तसेच पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.