प्रतिनिधी शहादा
येथील यशवंत नगर मधील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शिक्षक , स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे सेवेकरी आणि ह. भ प. आचार्य अनिलजी शर्मा महाराज संचलित भक्ति परिवाराचे सेवक मंगेश माणिकराव पाटील यांचे सुपुत्र मयुर मंगेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत महाराष्ट्रात ऑल रँक 38 तसेच ओबीसी संवर्गात 17 वा क्रमांक प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ही यशस्वी कामगिरी त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि कुटुंबीयांच्या प्रेरणादायी संस्कारांचे उज्ज्वल प्रतीक आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल
मयुर मंगेश पाटील याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. मयूर पाटील यांचे मूळ गाव हे शहादा तालुक्यातील वैजाली असून सर्व परिवार हा उच्चशिक्षित आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वैजाली या गावातील पहिला उमेदवार म्हणून उत्तीर्ण झाला आहे.वैजाली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल.
