Breaking Ticker

ग्रामपंचायत माळशिरस तालुका पुरंदर व स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त माळशिरस गावातील महिलांना महिला सक्षमीकरणाचे व स्वयंरोजगाराचे धडे देण्यात आले




प्रतिनिधी प्रविण वाघमोडे 


ग्रामपंचायत माळशिरस तालुका पुरंदर व स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला दिनानिमित्त माळशिरस गावातील महिलांना महिला सक्षमीकरणाचे व स्वयंरोजगाराचे धडे देण्यात आले तसेच आंब्याची झाडे भेट देण्यात आली यामागे पर्यावरणाचा होणार ऱ्हास म्हणजेच वनस्पतीचे झाडांची होणारी संख्या कमी यावर उपाय म्हणून आज महिला दिनाच्या निमित्त आंब्याची झाडे देण्यात आली जेणेकरून आंब्याच्या फळाच्या साठी या झाडांचे संरक्षण होऊन काही का प्रमाणात झाडांची संख्या वाढेल तसेच गावातील महिलांसाठी आरी वर्क चे प्रशिक्षणही देण्यात आले याद्वारे महिलांना स्वयंरोजगाराचे व स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी व्यावसायिक होण्यासाठी उपयोगात येण्यासारखे प्रशिक्षण देण्यात आले आज महिला मोठ्या प्रमाणावर आरी वर्क डिझाईन कडे वळल्या आहेत आरी वर्क बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत आहे याचेच औचित्य साधून स्वर्गीय शंकरराव नारायणराव सोट पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी व ग्रामपंचायत माळशिरस तालुका पुरंदर यांनी महिलांना आरी वर्क चे प्रशिक्षण दिले यातून महिला आर्थिक सक्षम होतील. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व आपली मनोगते व्यक्त केली. ग्रामपंचायत अधिकारी विलास बडदे यांनी शासकीय योजनांची व महिलांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती या कार्यक्रमांमध्ये दिली तसेच सरपंच आरतीताई यादव यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी माळशिरस तालुका पुरंदर गावच्या लोकनियुक्त सरपंच आरतीताई यादव ग्राम पंचायत अधिकारी विलास बडदे व संस्थेचे सचिव धीरज सोट पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.