Breaking Ticker

चैत्र नवरात्रीनिमित्त आई म्हाळसादेवी मंदिर परिसरात विविध कार्यक्रम साजरे



शहादा प्रतिनिधी 

        शहरातील नवसाला पावणारी देवी म्हणून म्हाळसा देवी प्रसिद्ध आहे. या म्हाळसा देवीचे मंदिर शहरातील डोंगरगाव रोड या ठिकाणी 2019 ला स्थापित करण्यात आले होते. बारा बलुतेदारांची कुलदैवत असलेली म्हाळसा मातेचे मंदिर हे जिल्ह्यातील एकमेव मंदिर असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये सोय झाली आहे. चैत्र नवरात्र महिन्यात कुलदेवीच मानसन्मान करण्याचे प्रथा आहे. याच नवरात्रीत जावळ देखील काढले जात असतात. शहादा परिसरातील मंदाने, सोनवद, सोनवल ,लोंढरे या गावाची म्हाळसा माता ही कुलदैवत आहे. त्यामुळे जावळ काढण्यासाठी या गावातून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. चैत्र नवरात्र च्या सुरुवातीस मंदिर ट्रस्ट सेवेकरी मार्फत साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. पहिल्या दिवशी मंदिराचे पुजारी विलास रेड्डी यांनी मातेचे शोडपचार पूजा करून, स्नान घातले.  मातेला नवीन साडी परिधान करण्यात आली. महिला भगिनी आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन करतात.


      चैत्र पौर्णिमेला नवरात्र उत्सवाची सांगता भंडारा प्रसादाने करण्यात येणार असल्याचे मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे यांनी सांगितले. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो. यावेळी भंडारा प्रसाद मंदिराच्या सेवेकरी पप्पू पाटील यांच्याकडून एक एप्रिल रोजी देण्यात येणार आहे. भंडारा प्रसादाच्या लाभ सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी घ्यावा असे आव्हान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संगीता कलाल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.