( माहूर प्रतिनिधी ) प्रवीण बरडे
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पंचशील विद्यालय, लखमापूर येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेत इयत्ता सहावीतील आदित्य राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता सातवीतील रचना राठोड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर इयत्ता पाचवीतील देवानंद जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
कार्यक्रमादरम्यान विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यात सुधारणा होण्यास मदत झाली असून, शालेय स्तरावर अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
