Breaking Ticker

आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. राजेंद्र पाटील यांचा सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मान



पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील रसायनशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र पाटील यांना आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धडगाव द्वारा आयोजित एक दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशांतील तसेच देशभरातील ३०० हून जास्त संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  सहभागी संशोधकांनी आपले संशोधन कार्य पोस्टर्सद्वारे तथा मौखिक पध्दतीने सादर करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी मौखिक पध्दतीने पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशनद्वारे सादरीकरण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संशोधन कार्य म्हणून डॉ. राजेंद्र पाटील यांच्या 'व्हॅलीडेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक इन्फ्लुइन्स ऑन सिंगलेट इन 1 एच एनएमआर स्पेक्टर ऑफ सम डायबेंझोझानथेन्स' या विषयावरील सादरीकरण ठरले.

डॉ. राजेंद्र पाटील यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. के. पटेल यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले व त्यांनी डॉ. राजेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले.

डॉ. पाटील यांना रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनिल बेलदार यांचे मार्गदर्शन तसेच डॉ. मिलिंद पाटील, डॉ.जगदीश चव्हाण, डॉ. सुधाकर उजगरे, डॉ. शिवनाथ पटेल आदींचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.दीपक भाई पाटील, उपाध्यक्ष मा. जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, मानद सचिव कमलताई पाटील व संचालक मयुर पाटील यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.