प्रतिनिधी शहादा
कार्यक्रम अणुव्रत समिती, शहादा यांच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भक्तीमय वातावरणात अणुव्रत गायन, संकल्प-सपथ ग्रहण तसेच मंगलाचरण ने करण्यात आली. संपूर्ण सभागृहात आध्यात्मिकता व नैतिकतेचा संदेश घुमत होता.
या प्रसंगी अणुव्रत समिती, शहादा चे अध्यक्ष भवरलालजी कोचर व मंत्री डालमचंदजी संचेती उपस्थित होते. तसेच महासभा ट्रस्टी रिषभजी गेलडा, शहादा तेरापंथ सभा अध्यक्ष कैलासजी संचेती, तेयुप अध्यक्ष अलोकजी गेलडा यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.
यासोबतच पारस पापड उद्योग समूहाचे संचालक पारसमलजी कुचेरिया, मानकलालजी बुरड, इंदरचंदजी कोचर, अभयजी संचेती, तसेच नवकार ग्रुपचे अध्यक्ष प्रमोदजी चोपडा, विजयजी बोरा, विनयजी संचेती, प्रवीणजी छल्लाणी, जितेंद्रजी गेलडा, वर्धमानजी गेलडा उपस्थित होते.
महिला मंडळातून सौ. लक्ष्मीजी गेलडा, ज्येष्ठ श्राविका सौ. शंकुंतलाजी गेलडा, चंद्रकलाजी गेलडा, कमलाबाईजी संचेती यांची विशेष उपस्थिती लाभली.
मोठ्या संख्येने लहान मुलांपासून ते ज्येष्ठ समाज बांधवांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्व उपस्थितांनी अणुव्रताच्या तत्त्वांचा स्वीकार करून नैतिक, संयमी व आदर्श जीवन जगण्याचा संकल्प केला. कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व यशस्वी ठरला
