शहादा,दि.०४ (प्रतिनिधी)
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित 'ट्रॅडिशनल डे' (पारंपारिक दिन) अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
दिनांक ४ मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध प्रांतांचे आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे पारंपारिक पोशाख परिधान केले होते. यामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर रंगीबेरंगी वेशभूषेने आणि उत्साहाने न्हाऊन निघाला होता.कार्यक्रमात वेशभूषेची विशेष स्पर्धाही रंगली. यामध्ये आपल्या आकर्षक पेहरावासाठी खालील विद्यार्थ्यांनी बाजी मारली,कु.सिमरन लालचंद अहुजा (एसवाय बीएस्सी),हर्षल संजय बडगुजर (टिवाय बीएस्सी रसायनशास्त्र)या दोघांनाही त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी आणि वेशभूषेसाठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.चंद्रशेखर सुतार यांच्यासह डॉ. मृणाल जोगी, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. अनिल बेलदार, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. जगदीश चव्हाण आणि डॉ. सुधाकर उजगरे यांनी अथक परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे आणि उत्साहाचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील,उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील,मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा.मकरंद पाटील,संचालक मयूरभाई पाटील,प्राचार्य डॉ. एम. के. पटेल या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
