Breaking Ticker

खेळता खेळता ओढ्याच्या पाण्यात तोल जाऊन 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू....



आंबेगाव (पुणे)( प्रतिनिधी :- तुषार असवले) :- आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक चौरे मळा येथील, परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षीय कृष्णा प्रशांत चौरे या मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार कृष्णा हा आपल्या घराच्या शेजारी असलेल्या ओढ्याच्या बाजूला खेळत होता, खेळत असताना कृष्णाचा अचानक तोल जाऊन कृष्णा ओढ्याच्या पाण्यात पडला, ओढ्याच्या पाण्यातून त्याला बाहेर येणे शक्य न झाल्याने त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान परिसरात आरडाओरडा झाल्याने त्वरित नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने कृष्णाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले व तातडीने उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे हलवण्यात आले परंतु उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.