कमलाकर वाघमारे प्रतिनिधी (जळकोट)
आज दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती जळकोटच्या नूतन गट विकास अधिकारी श्रीमती ए.एस. चितारी यांचा पंचायत समिती सभापती व उपसभापती, सदस्य यांच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पंचायत समिती जळकोट येथील गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांची बदली उदगीर येथे झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर दिनांक २३एप्रिल २०२६रोजी श्रीमती ए.एस. चितारी यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी पंचायत समिती सभापती कोसंबे व उपसभापती प्रा.माधव वाघमारे पंचायत समिती सदस्य राहुल झोले आदिसह उपस्थित होते.नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी ए. एस. चितारी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
