विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 सार्वजनिक जयंती उत्सव सिद्धनाथ बोरगाव ता सेलू जि परभणी दिनांक 30 /04/2026रोजी संपन्न झाली गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या नंतर तो बंड करून उठेल तुम्हा आम्हाला गुलामाची जाणीव करून देणार पाणी गुलामीचे सुटका करून देणारे दलितांचे कैवारी महामानव प्रज्ञासूर्य बोधीसत्व परमपूज्य डॉ .भीमराव रामजी आंबेडकर यांची 135 वी जयंती प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सिद्धनाथ बोरगाव येथे सर्व जाती धर्मातील लोकांनी थाटामाटातत आनंदात साजरी करण्यात आली व कार्यक्रमाची शोभा वाढवली . सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहणव बौद्ध वंदना सिबोर भंतीजी यांच्या हस्ते करण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा .विजयरावजी भांबळे म्हणून उपस्थित होते .प्रमुख पाहुणे मिलिंद दादा सावंत नगराध्यक्ष सेलू . कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ज्ञानेश्वर लिपने (चेअरमन ),अशोकराव लिपने प्रमुख उपस्थित नामदेव मोताळे साहेब (ग्राम महसूल अधिकारी ) ,संदीप सूर्यवंशी ( जि प प्रा शाळा शिक्षक सि बोरगाव ) दराभाऊ नाटकर (पोलीस पाटील ), समाधान लिपने, सुनील लिपने,जयंती कमिटी गौतम बंदुके, रोहिदास पौळ, कचरू पौळ, विठ्ठल डोळसे, बाळू पौळ, राजेभाऊ पौळ, कार्यक्रमाची व्यवस्था सुदाम अंभुरे व सूत्रसंचलन रमेश पौळ हे होते .
