Breaking Ticker

हसते-खेळते बालपण शेततळ्याने हिरावले; दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत..



 हसते-खेळते बालपण शेततळ्याने हिरावले; चिमुरड्याचा दुर्दैवी अंत.


जुन्नर (पुणे)( प्रतिनिधी :- तुषार असवले) :- जुन्नर तालुक्यातील पांगरी माथा बल्लाळवाडी येथील परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षीय अभिषेक महेश पवार आणि इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय सोहम जयसिंग नवले या दोन जिवलग मित्रांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार अभिषेक आणि सोहम हे दोघे नुकतेच शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे घराच्या बाजूला असलेल्या शेततळ्याच्या कडेला खेळत होते . खेळत असताना अभिचा अचानक तोल जाऊन अभी शेततळ्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी सोहम गेला परंतु शेततळ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळं दोघांवर काळाने घाला घातला आणि दोघांचा त्यात बुडून मृत्यू झाला. 

       या प्रकरण पोलिसांनी अकस्मक मृत्यूची करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये असेही पोलिसांनी सांगितले.

अभिषेक आणि सोहम अभ्यासात हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाचा असल्यामुळे शिक्षक आणि मित्रांचा लाडका होता. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान गावात शोकसभा घेऊन दोन्ही मुलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.